पुणे : होळीच्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर पादचारी नागरिक आणि तरुणींना पाण्याचे फुगे मारून हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करुन हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांना पकडले.

होळीच्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर पादचारी नागरिकांवर दुचाकीस्वार मुलांनी फुगे फेकले होते. गुन्हे शाखा. युनिट एकचे पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे आणि शशिकांत दरेकर यांनी शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटिव्ही कॅमेरे पडताळून कसबा पेठ परिसरातील दोन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…“पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन द्या”; पुण्यात झळकले बॅनर्स

तसेच अल्पवयीन मुलांचे पालक रंगास्वामी मगअण्णा गौडा (वय ५५, रा. हडपसर ), धोंडीराम मच्छिंद्र आखाडे (वय ४५ वर्ष, रा. कागदी पुरा कसबा पेठ ) यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार फिर्याद देण्यात आली आहे. पुढील कारवाई करण्यासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा…भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज; अजित पवारांची साथ सोडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक रमेश तापकीर, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, महेश बामगुडे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, आय्याझ दड्डिकर ,महेश सरतापे यांनी ही कारवाई केली.