पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात भरधाव ट्रकने टेम्पोला धडक दिली. अपघातानंतर टेम्पो उलटून एकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे घडली. अली मोहम्मद यार मोहम्मद (वय २१, रा. दिरीहार, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोचालक मसिहउद्दीन खान (वय ३६, रा. शिळ फाटा, कौसा, जि. ठाणे) याने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पोचालक खान याने पहाटे साडेचारच्या सुमारास नवले पुलाजवळ टेम्पो लावला होता.

हेही वाचा : पुणे : मिळकतकरात ४० टक्के सवलतीसाठी आज शेवटचा दिवस… अर्ज स्वीकारण्याची ‘या’ ठिकाणी व्यवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेम्पोत खान आणि मदतनीस मोहम्मद होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टेम्पोला धडक दिली. टेम्पो उलटल्यानंतर मोहम्मद गंभीर जखमी झाली. टेम्पोचालक खान याला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या ट्रकचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करत आहेत. नवले पूल परिसरात दोन दिवसांपूर्वी भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.