पुणे : ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात ‘सेंसरी प्रोसेसिंग डिसऑर्डर’ असलेल्या किंवा स्वमग्न मुलांसाठी संवेदी उद्यान विकसित करण्यात आले आहे. राज्यातील या प्रकारचे हे पहिलेच उद्यान असून, या उद्यानाच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारात्मक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

महावीर एन्टरप्राईझेसच्या सहकार्याने तयार केलेल्या या उद्यानाचे उद्घाटन ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पंडित, डॉ. पौर्णिमा पंडित यांच्या हस्ते झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायचीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह डॉ. आनंद काटीकर, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, प्राचार्या डॉ. स्नेहल जोशी, प्रा. धनंजय कुलकर्णी, सलील जैन या वेळी उपस्थित होते. मुलाला विशिष्ट चव आवडत नाही किंवा फक्त कुरकुरीत अन्न आवडते, मुलाला वेगाने झोका आवडतो किंवा अजिबात आवडत नाही. मुलाला मिठी मारणे आवडत नाही किंवा मुल नेहमी तोंडात बोटे घालते. मुलाला फक्त मऊ कपडे आवडतात, असे पालकांचे म्हणणे असते. मात्र, स्पर्श, आवाज, उंची, चव, हालचाल या बाबतीत अतिसंवेदनशील किंवा असंवेदनशील असण्याची लक्षणे आहेत. वैद्यकीय भाषेत याला ‘सेंसरी प्रोसेसिंग डिसऑर्डर’ (एसपीडी) असे म्हणतात. या फक्त एसपीडी असू शकतात किंवा त्याचा संबंध स्वमग्नतेशी संलग्न असू शकतो. सध्या देशात एसपीडीचे प्रमाण ६ मुलांमध्ये एक, तदर स्वमग्न मुलांचे प्रमाण ६८ मध्ये १ असे आहे.

हेही वाचा : ऐन पावसाळ्यात पुण्यात उकाडा… काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील मुलांना अतिसंवेदनशीलपणा कमी करणे, असंवेदनशीर मुलांना संवेदनशील करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने या बाबतच्या उपचारांसाठी संवेदी उद्यान फर्ग्युसन महाविद्यालयात विकसित करण्यात आले आहे. या उद्यानाच्या माध्यमातून तज्ज्ञ फिजिओथेरिपिस्टचे मार्गदर्शन, तोल सांभाळणे, कठीण ,गुळगुळीत, टोकदार अशा विविध प्रकारच्या अशा पृष्ठभागांवरून चालणे, विविध प्रकारचे झोके, रंगीत मार्गिका आणि अशा प्रकारची विविध साधने उपलब्ध होणार आहेत. या साधनांचा वापर करून सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत या एसपीडी आणि स्वमग्न सर्व प्रकारच्या संवेदनांचा समतोल राखण्यासाठी व्यायाम घेतले जाणार आहेत.