पुणे : शहरात सकाळी हलका पाऊस झाला. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रस्ते निसरडे झाले. सेनापती बापट रस्ता, कोथरुड परिसरात दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. शहरात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हलका स्वरुपाचा पाऊस झाला. पावसाच्या एक ते दोन सरी कोसळल्यानंतर रस्ते निसरडे झाले. रस्ते निसरडे झाले. सकाळी कामावर निघालेले दुचाकीस्वार रस्ते निसरडे झाल्याने घसरून पडल्याच्या घटना घडल्या. सेनापती बापट रस्ता, पौड रस्ता, कोथरुड परिसरात दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

हेही वाचा : देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ज्या भागात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. तेथे माती टाकली. रस्ते धुवून काढले. वाहनांमधील ऑइल रस्त्यांवर सांडते. हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर रस्ते निसरडे होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या घटना घडतात. शुक्रवारी सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने रस्ते निसरडे झाल्याने दुचाकीस्वार घसरल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे आल्या.