पुणे : किरकोळ वादातून शाळकरी मुलावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह दाेन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आदील शेख (नय २०), अज्जू उर्फ अजहर इलीयास शरीफ (वय २३, रा. चाँदतारा चौक, नाना पेठ) यांच्यासह दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका शाळकरी मुलाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना

tuzyat jeev rangla fame hardeek joshi gifted new car to his father
पाठकबाईंनी सासऱ्यांबरोबर शेअर केला खास फोटो, तर हार्दिक जोशीने वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, म्हणाला…
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
bengluru crime news
‘नवविवाहित दाम्पत्याचे खिडकी उघडी ठेवून शरीरसंबंध’, शेजारणीची पोलिसांत तक्रार
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

तक्रारदार शाळकरी मुलगा आणि त्याचा मित्र भवानी पेठेतील एका शाळेत शिकायला आहेत. दोघांची वर्गातील एका मुलाशी भांडणे झाली होती. शाळकरी मुलगा आणि त्याचे साथीदार आदील, अजहर शाळेच्या परिसरात आले. त्यांनी शाळकरी मुलगा आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. शाळकरी मुलाच्या मित्रावर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक देवकर तपास करत आहेत. महिनाभरापूर्वी भवानी पेठेत शाळकरी मुलावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी शाळकरी मुलांसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.