पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी, ५८ गैरप्रकारांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक २६ गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर येथे, तर पुणे येथे १५ गैरप्रकारांची नोंद झाली. राज्य मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. बुधवारी इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तसेच २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : सुनील तटकरे स्पष्टच बोलले, “सुनेत्रा पवारच बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार”

SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Complaint to the Election Commission against Mahavitaran under jurisdiction of Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…
alpa shah
भीमा-कोरेगाव प्रकरणात खोटे पुरावे पेरले!

जिल्हा स्तरावरही स्वतंत्रपणे भरारी पथके परीक्षा केंद्रांना भेट देणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. तसेच परीक्षेदरम्यान राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर झालेल्या गैरप्रकारांची माहिती राज्य मंडळाकडून संकलित करण्यात येते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात ५८ गैरप्रकारांची नोंद झाली. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतील पाच विभागीय मंडळांमध्येच गैरप्रकारांची नोंद झाली आहे. पुणे विभागात १५, नागपूर विभागात एक, नाशिक विभागात दोन, छत्रपती संभाजीनगर विभागात २६, लातूर विभागात १४ गैरमार्ग प्रकरणांची नोंद झाली.