पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. येत्या दोन मार्च रोजी भूमीपूजन होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

या स्मारकाचा अद्ययावत आराखडा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यासाठी ११५ कोटींचा खर्च अपेक्षित असून संगमवाडीयेथील सर्वेक्षण क्रमांक ५२ पार्ट, ५४ पार्ट येथे स्मारक नियोजित आहे. स्मारकाचे काम रखडल्यामुळे अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी त्याबाबत सातत्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंदाजपत्रकात केली आहे. भूमीपूजनानंतर महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
question mark on quality of work done by municipality synthetic track was laid in five days
पिंपरी : पालिकेच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह, पाच दिवसांत उखडला सिंथेटिक ट्रॅक
Unique movement of Thackeray group on crop insurance issue in Jalgaon
जळगावात पीक विमाप्रश्‍नी ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन
try to close the Forest Range Officer Deepali Chavan suicide case
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण बंद करण्याचा घाट!

हेही वाचा…पुणे : स्वदेशी ‘जीएमआरटी’चा ३८ देशातील शास्त्रज्ञांकडून वापर

स्मारकाचा आराखडा महापालिकेने केला असून त्यामध्ये तीन मजल्यांची १२० गाड्यांसाठी स्वतंत्र वाहनतळाची सुविधा आहे. यशिवाय बहुउद्देशीय सभागृह, उपाहारगृह, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वसतीगृह, संग्रहालय आणि आर्ट गॅलरी, प्रशासकीय इमारत, दोन मजली शारीरिक प्रशिक्षण केंद्र, संशोधन आणि विकास केंद्राचा समावेश आहे.