पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पाहणी केली. श्रीमंत बाजीराव पेशवे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून एनडीएमध्ये पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी एनडीए येथे जाऊन पुतळा उभारणीच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंदनकुमार साठे, भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिल्पकार विपुल खटावकर, स्कवॅड्रन लीडर प्रकाश शिंदे, मेजर राहुल शुक्ला, कर्नल रमीनदर सिंग यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : दरड कोसळून छत्र हरवलेल्या इरशाळवाडीतील मुला-मुलींची अनोखी दिवाळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या इतिहासातील थोरले बाजीराव पेशवे झंझावाती व्यक्तिमत्व होते. त्यांनी केवळ युद्धभूमीवरच आपले कौशल्य सिद्ध केले नाही, तर उत्तम प्रकारे प्रशासन सांभाळले. त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी आहे, असे पाटील यांनी सांगितले.