Vasant More Resign MNS: मनसेचे खंदे नेते असलेला वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोरे यांनी पुण्यात शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे. शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय राहिले आहे. वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे कोण ? त्यांची राजकीय कारकीर्द सतत चर्चेत राहिली.

राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय हाती घेतल्यानंतर मोरे यांनी निर्भिडपणे आपले मत मांडत त्या धोरणाबद्दल हरकत नोंदवली होती. त्यावेळी ते उभ्या महाराष्ट्राला माहिती झाले. बी. कॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेले वसंत मोरे शिवसेनेत असताना राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर स्वाभाविकच वसंत मोरे राज ठाकरे यांच्या ‘मनसे’त गेले. २००७ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदा कात्रज प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१२ आणि २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांनी सहज विजय मिळविला. गेल्या १५ वर्षांहून अधिकच्या राजकीय कारकिर्दीत निवडणुकीतील प्रभागांची रचना आणि नावे बदलली पण नगरसेवक म्हणून जनतेसाठी केलेल्या कामामुळे त्यांचा करिष्मा कायम राहिला.

bhiwandi lok sabha marathi news
भिवंडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काँग्रेसशी अजूनही सूर जुळेना
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
archana patil dharashiv ncp candidate
राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणतात, “मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू?” तीन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांचं विधान चर्चेत!
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

हेही वाचा : मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, म्हणाले, “मी राज मार्गावर…”

प्रभाग कोणताही असो किंवा कसाही असो जनतेसाठी काम करतच राहणार हा विश्वास ठेवणारे वसंत मोरे यांची हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. सध्या ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढविण्याची त्यांची सुप्त इच्छा होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हॅटट्रीक करणारे ते राज्यातील पहिले नगरसेवक आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरेंच्या नेतृत्व गुणाला तसेच त्यांनी मांडलेल्या या लोकसेवेच्या यज्ञाला कायमच पाठिंबा दिला. पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी निष्ठेने पार पाडल्या आहेत.

हेही वाचा : Vasant More Resignation: वसंत मोरेंचा मनसे आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र, मध्यरात्री केली होती ‘ती’ पोस्ट

समाजमाध्यमातही वसंत मोरे तेवढेच सक्रिय असतात. बदललेली राजकीय परिस्थिती समाजमाध्यमातून ते व्यक्त करत असलेल्या भावना कायमच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतात. करोना संसर्ग काळात त्यांनी केलेल्या कामामुळे तर मोरेंची दखल वर्ल्ड बुक रेकॉर्ड, लंडन या संस्थेकडून घेण्यात आली होती. नगरसेवक असताना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, शहराध्यक्ष, गटनेता, विरोधी पक्ष नेता, प्रभाग समिती अध्यक्ष, शहर सुधारणा समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.