पुणे : शहरातील येरवडा भागात उधारीवर दारू न दिल्याने वाईन शाॅपमधील एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.या प्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. रोहित पिल्ले (वय २५, रा. जयजवानगर, लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील एका वाईन शाॅपमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी रोहित पिल्ले हा गेला होता.त्यावेळी तेथील कामगाराकडे त्याने उधारीवर दारूची बाटली मागितली.उधारीवर दारू देण्यास कामगाराने नकार दिला.त्यामुळे आरोपी रोहित पिल्ले हा चिडला आणि कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली.त्या मारहाणीत कामगाराचा दात पडला आणि गंभीर दुखापत देखील झाली.या मारहाण प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार देताच,आरोपी रोहित पिल्ले विरोधात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.