scorecardresearch

पुणे : पूर्ववैमनस्यातून गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करुन खून

गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली.

young man stabbed to death in pune, ganesh peth murder, previous enmity murder
पुणे : पूर्ववैमनस्यातून गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करुन खून (संग्रहित छायाचित्र)

पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे (वय २९, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी हर्षल पवार आणि साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : पुणे: नवले पुलाजवळ तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

air purifier van in navi mumbai, navi mumbai air pollution, air purifier van at vashi and kopar khairane
नवी मुंबई : वायुप्रदूषणावर महापालिकेचा धूळ शमन यंत्राचा उतारा; आठवडाभर वाशी, कोपरखैरणे परिसरात रात्रीच्या वेळी राहणार तैनात
gps loss
GPS ने भरकटवलं, मुसळधार पावसात नदीत बुडाली गाडी; तरुण डॉक्टरांचा करुण अंत
pune ganesh visarjan 2023, pune ganeshotsav 2023, dagdusheth ganpati visarjan 2023
Pune Ganesh Visarjan 2023 Live : यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडला….दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ दुपारी चार वाजताच विसर्जन मिरवणूक मार्गावर!
Husband commits suicide
“तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे याचे हर्षल पवार आणि त्याच्या साथीदाराशी किरकोळ वाद झाले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घराजवळ थांबला होता. पवार आणि त्याचे साथीदार कोयते घेऊन आले. त्यांना पाहून सिद्धार्थ ओसवाल बिल्डिंगमध्ये शिरला. तो पळत पळत छतावर गेला. तेथे हल्लेखोरांनी त्याला गाठून कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune young man stabbed to death in ganesh peth due to previous enmity pune print news rbk 25 css

First published on: 20-11-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×