पुणे : विमानननगर भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत दिग्विजय देसाई (वय २३, रा. विमाननगर ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, विमाननगर येथील कोणार्कनगर फेज वन परिसरात बांधकाम मजुरांची वसाहत आहे. देसाई हे पर्यवेक्षक म्हणून काम करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास महिलांच्या प्रसाधनगृहाजवळ साचलेल्या पाण्यात नवजात अर्भक आढळले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. नवजात अर्भकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. नवजात अर्भक बेवारस अवस्थेत टाकून देणे, तसेच पालकत्वाची जबाबदारी न स्विकारल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.