पुणे : सिंहगड रस्ता भागानंतर आता खराडी भागात एमएनजीएलच्या गॅस वाहिनीला आग लागल्याची घटना घडली. गॅस वाहिनीला आग लागल्याने खराडी भागातील गॅस पुरवठा विस्कळीत झाला.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या दमदाटीमुळे तरुणाच्या मृत्यूचा नातेवाईकांचा आरोप, उपायुक्तांकडून चौकशीचे आदेश

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

हेही वाचा – राज ठाकरे पुन्हा अयोध्येत आल्यास स्वागत करणार का? या प्रश्नावर खासदार बृजभूषण सिंह म्हणाले, “मी कुस्तीचा…”

सिंहगड रस्ता भागात शुक्रवारी मध्यरात्री गॅस वाहिनीला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता खराडीतील विठ्ठल बोराटे नगर परिसरात एमएनजीएलच्या गॅस वाहिनीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान रघुनाथ भोईर, उमाकांत डगळे, विलिन रावत, नवनाथ वायकर, अमित वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहिनीच्या शेजारी असलेल्या हातगाडीने पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. एमएनजीएलच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन गॅस पुरवठा बंद केला आणि तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.