लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अयोध्या येथील राममंदिर उद्घाटनाच्या आनंद सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश आवश्यक करावा, अशी मराठी जनांची मागणी असल्याची भावना माडगूळकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. राममंदिरामध्ये एक कोपरा गदिमा-बाबुजी यांच्या गीतरामायणासाठी राखीव करावा, अशी अपेक्षा गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी बोलून दाखविली.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मनातले गीतरामायणाचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे. अयोध्येतील राममंदिरात एक कोपरा तरी गीतरामायण आणि गदिमा-बाबुजी यांच्यासाठी राखीव हवा असे मनापासून वाटते, असे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-परीक्षेचं टेन्शन आलंय? ‘सीबीएसई’ करणार विद्यार्थ्यांना मदत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राबाहेरही गीतरामायण पोहोचले पाहिजे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या आनंद सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश झाला तर यासारखा परमोच्च आनंद दुसरा नाही. मुख्यतः राम मंदिरात एक छोटे गीतरामायण मंदिर हवे. गीतरामायणाचे अनेक भाषांत रूपांतर झाले आहे. त्यामुळे गीतरामायण आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतमय व्हावे ही श्रीराम चरणी प्रार्थना, असल्याची भावना सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली.