पुणे : डॉलरच्या तुलनेत इतर चलनांपेक्षा भारतीय रुपयाची अवस्था चांगली ; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा दावा | Indian rupee is doing better than other currencies against the dollar Union Finance Minister Sitharaman claim pune print news amy 95 | Loksatta

पुणे : डॉलरच्या तुलनेत इतर चलनांपेक्षा भारतीय रुपयाची अवस्था चांगली ; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा दावा

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये टोकाचे चढ-उतार होत नाहीत. मात्र, इतर देशांची चलने डॉलरच्या तुलनेत खाली-वर होऊन सातत्याने घसरत आहेत.

पुणे : डॉलरच्या तुलनेत इतर चलनांपेक्षा भारतीय रुपयाची अवस्था चांगली ; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा दावा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये टोकाचे चढ-उतार होत नाहीत. मात्र, इतर देशांची चलने डॉलरच्या तुलनेत खाली-वर होऊन सातत्याने घसरत आहेत. भारतीय रुपयाचे तसे होत नाहीये, ही दिलासा देणारी बाब आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची अवस्था चांगली असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पुण्यात केला.

हेही वाचा >>> पप्पा आईला नका मारू असे म्हणणार्‍या आठ वर्षाच्या मुलीवर बापाने झाडली गोळी

शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बऱ्यापैकी आहे. त्यात टोकाचे चढ-उतार होत नाहीत. यावर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. महागाईवर नियंत्रणासाठी केंद्राकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. खाद्य तेल आणि डाळींची उपलब्धता वाढविण्यासाठी आयात शुल्क हटवले आहे. त्यामुळे खाद्य तेल आणि डाळींचा पुरवठा वाढला आहे. परिणामी त्यांच्या किमती नियंत्रणात आल्या आहेत. सहकार क्षेत्रालाही करातून सवलत देऊन केंद्राने दिलासा दिला आहे.’

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नाणार, वाढवण, बुलेट ट्रेन, कारशेडबाबत आधी उत्तरे द्या, मगच वेदान्तबाबत प्रश्न विचारा ; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचे आव्हान

संबंधित बातम्या

पुणे:राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पुणे:बेकायदा सावकारी प्रकरणात एकाला अटक; व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही धमकी
पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी अटकेत
पुण्याच्या कात्रजमध्ये मोटारीला वाट न दिल्याने टेम्पोचालकास बेदम मारहाण; मोटारचालक अटकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
लाडक्या राहाला पहिल्यांदा भेटण्यासाठी तैमूर आतुर; ‘या’ दिवशी होणार भावा-बहिणीची भेट
IND vs BAN ODI: बांगलादेशला मोठा धक्का; तस्किन अहमद भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर
मुंबई: गुगलवर ट्रॅव्हल्स कंपनीचा क्रमांक शोधणे पडले महागात
झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल
देशी जुगाड! मुलाने बनवली भन्नाट गाडी, केवळ १० रुपयांमध्ये पार करणार १५० किलोमीटरचं अंतर