पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पाार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलिसांनी तीन दिवसांंत शहर आणि उपनगरातील एक हजार ५१३ सराइतांची झाडाझडती घेऊन त्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. कायदा आणि सुुव्यस्थेला बाधा आणल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

पोलिसांनी नाकाबंदी, गुन्हेगारांचे वास्तव्याचे ठिकाणी अचानक तपासणी (कोम्बिंग ऑपरेशन) केली आहे. परिमंडळ एक ते पाच मधील सराइतांना विविध पोलीस ठाण्यांंत बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत शहरातील एक हजार ५१३ सराइतांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना समज देण्यात आली असून, काहींना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>आता पीएच.डी. प्रबंधाला मिळणार पुरस्कार… काय आहे युजीसीची नवी योजना?

सराइत गु्न्हेगार, त्यांची वास्तवाच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. गुन्हे शाखा, तसेच पोलीस ठाण्यांमधील तपास पथकांकडून सराइतांची चौकशी करण्यात येत आहे. कायदा आणि सुुव्यस्थेला बाधा आणल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

हेही वाचा >>>राहुल गांधी यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री अपरात्री फिरणाऱ्यांंवर कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी, तसेच कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. रात्री अपरात्री फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

नागरिकांनी कायदा आणि सुवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणारे कृत्य करू नये. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त