पिंपरी – चिंचवड : आयटी हब हिंजवडीमधून एक धक्कादायक घटना समोर आली. २३ वर्षीय आयटी इंजिनिर पियुष अशोक कवडे याने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी दहा च्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी पियुष कवडे ने सुसाईड नोट लिहिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष कवडे हा गेल्या एक वर्षापासून हिंजवडी फेज वन येथील ॲटलस कंपनीत आयटी इंजिनीयर म्हणून काम करत होता. आज सकाळी त्याची मिटिंग सुरू होती. याच दरम्यान छातीत दुखत आहे, अस म्हणून तो बाहेर आला आणि थेट सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पियुष ने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. “मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे. मला माफ करा” अशा आशयाची सुसाईड नोट लिहून पियुष ने आपलं आयुष्य संपवलं आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सकाळी दहा च्या सुमारास घटना घडली आहे. पियुष अशोक कवडे अस आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. अधिक तपास सुरू आहे.” – बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.