Jaykumar Gore Accident Health Updates: भारतीय जनता पार्टीचे आमदार व सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोरे यांच्याबरोबरच इतर चार जणांनाही दुखापत झाली असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गोरे यांच्या प्रकृतीसंदर्भात रुबी रुग्णालयातील न्यूरो ट्रॉमा विभाग, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.

“आज पहाटे गोरे यांचा अपघात झाला. आम्हाला सकाळी सहा वाजता कळविण्यात आले की आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. त्यांना रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याचं आम्हाला सांगण्यात आल्यानंतर आमची डॉक्टरची टीम सज्ज होती. सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी जयकुमार गोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले,” असं डॉ. झिरपे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आमच्या टीमने त्यांना तपासलं. सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. ते शुद्धीवर आहेत. व्यवस्थित बोलत आहेत. त्यांचा रक्तदाब,हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत. त्यांच्या छातीला डाव्या बाजूला मुका मार लागला आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही.”

“माझी सर्वांना विनंती आहे की घाबरुन जाण्याची गरज नाही. आमदारसाहेब सुखरुप आहेत. उपचाराला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. पेनकिलर दिल्यानंतर त्यांना रिलीफ मिळाला आहे,” असंही झिरपे म्हणाले.

नक्की वाचा >> BJP MLA Gore Car Accident: “गोरेंचा रात्री ३ वाजून पाच मिनिटांनी फोन आला की गाडीचा…”; मदतीसाठी पोहोचलेल्याने सांगितला घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमी लगत पहाटे साडेतीनच्या सुमारास गोरेंच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात गेली.  ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या अपघातात आमदार जयकुमार गोरे जखमी झाले आहेत. यात जयकुमार गोरेंचे दोन अंगरक्षक, चालक आणि खासगी सचिवाचा समावेश आहे.