जेजुरी वार्ताहर

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील पिग्मी एजंट अच्युत शेळके यांची दुचाकी गाडी अडवून त्यांचेवर कोयत्याने वार करून एक लाख रुपये जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शुभम जाधव या आरोपीला जेजुरी पोलिसांनी पिंगोरी येथील शेतामध्ये सापळा रचून पकडले.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदपूर (जि. लातूर) येथील पिग्मी एजंट अच्युत शेळके हे ८ डिसेंबर रोजी कामास असलेल्या एजन्सीचे पैसे जमा करून घरी जात होते,यावेळी त्यांची दुचाकी अडवून त्यांचेवर धारदार कोयत्याने शुभम जाधव याने वार केले ,व त्यांचेजवळील एक लाखाची रक्कम घेऊन तो फरारी झाला होता, हा आरोपी जेजुरी परिसरातील उंच डोंगरावर असलेल्या पिंगोरी गावातील एका नातेवाईकांच्या शेतात लपून बसल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली, त्यानंतर तातडीने या आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, भोर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे ,हवालदार दशरथ बनसोडे ,प्रशांत पवार, राहुल माने ,योगेश चितारे यांच्या पोलीस पथकाने आरोपीस शेतात जाऊन जेरबंद केले. शुभम जाधव या आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली.