पुणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, पुणे व अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्ट, बंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दिनांक १७ फेब्रुवारी २०२५) सकाळी ९ वाजता ग्रँड तमन्ना हॉटेल, प्लाट नं १६, फेज-२, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे येथे “पंडीत दीनदयाल उपाध्याय दिव्यांग रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सा.बा. मोहिते यांनी दिली आहे.

या दिव्यांग रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील नामांकित २० पेक्षा जास्त उद्योजक सहभागी होणार असून, त्यांच्याकडून ९०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर अशा विविध पात्रताधारक दिव्यांग उमेदवारासाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक दिव्यांग उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांसाठी अर्ज करावा.  खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी सोमवारी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याच्या विकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही मोहिते यांनी म्हटले आहे.