पुणे : भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांच्या वतीने प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय-सामाजिक विश्लेषक राजू परुळेकर यांना यंदाचा लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.भाई वैद्य यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी (२२ मे) एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य यांच्या हस्ते परुळेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकारितेबरोबरच परुळेकर यांनी विविध दूरचित्र मालिका, लघुपट आणि चित्रपट यांच्यासाठी कथा-पटकथा आणि संवादलेखन केले आहे. त्यांची पुस्तके प्रसिद्ध असून, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, असे भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.