नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडीच्या कोकणकड्यावरून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नर पोलीस आणि शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह बाहेर काढले.

जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली. आत्महत्या केलेला प्रियकर दुर्गवाडी येथील मूळ रहिवासी असून, कामानिमित्त श्रीगोंदा येथे वास्तव्यास होते. तो विवाहित होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल केली होती. तर, युवती बेपत्ता असल्याची तक्रार १५ मे रोजी जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तिचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दुर्गवाडी येथे कड्यापासून काही अंतरावर एक चारचाकी काही दिवसांपासून उभी असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तसेच, कोकणकड्यावर चपला आढळून आल्या होत्या. त्यावरून कोणी तरी कड्यावरून पडल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली. पोलीस आणि शिवजन्मभूमी रेस्क्यू पथकाचे सदस्य आणि ग्रामस्थांनी शोध घेतला असता, कड्याखाली दोन मृतदेह आढळून आले. जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण, जुन्नर पोलीस ठाण्याचे फौजदार रघुनाथ शिंदे, पोलीस कर्मचारी गणेश शिंदे, दादा पावडे यांनी मृतदेह दरीतून बाहेर काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा
माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादी अजित पवार गटात?

नातेवाइकांच्या त्रासामुळे आत्महत्या

या ठिकाणी पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्यामध्ये नातेवाइकांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जुन्नर पोलीस तपास करीत आहेत.