पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून सभा रॅली आयोजित करण्यात येत आहे. तर पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर, महायुतीकडून हेमंत रासने आणि मनसेकडून गणेश भोकरे अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ फडके हौद चौकात सभा घेतली. या सभेत अनेक नेत्यांनी रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका केल्याचे पाहण्यास मिळाले. त्या सभेदरम्यान तुमच्यावर टीका केली. कसबा पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवार नव्हता. या निवडणुकीत उमेदवार असल्याने तुम्हाला फटका बसू शकतो का, त्या प्रश्नावर रविंद्र धंगेकर यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

मनसे हा एक पक्ष असून त्यांचा उमेदवार देखील या निवडणुकीत आहे. त्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार ते काम करीत आहे. कोण कोणाला मतदान करेल हे मतमोजणीच्या दिवशी निश्चित कळेल, कालच्या सभेत सर्वांनी विचार मांडले आहेत आणि राजकारणात थोड्या फार टीका होत असतात. त्याशिवाय त्याला राजकारणाच व्यासपीठ म्हणता येणार नाही. यामुळे त्यांच्या टीकेच मी स्वागत करतो. माझे ते सहकारी राहिले आहेत. पण फटका ही जनता देत असते. पक्ष किंवा उमेदवार फटका देत नसतो. जनता ठरवत असते की, कोणाला मतदान करायचे, जनता हुशार आहे. पण सत्तेचा बाजार मांडला आहे. कोण कोणाचा उमेदवार आहे. कोण कोणाला पैसे पुरवत आहे. हा राजकारणाचा भाग असून मी या सर्व गोष्टींकडे खेळाडूवृत्तीने बघणारा कार्यकर्ता आहे. निवडणूक ही एका दिवसापूर्ती आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करू नये, अशी भूमिका यावेळी रविंद्र धंगेकर यांनी मांडली.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा – पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा – पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारसंघातील जनता तुमच्या पाठीशी राहिली. त्याप्रमाणे या निवडणुकीत जनता पाठीशी राहील का त्या प्रश्नावर रविंद्र धंगेकर म्हणाले की, पुणे शहराचा जवळपास ३० किलोमीटरपर्यंतचा भाग आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मला नागरिकांपर्यंत पोहोचण्यास अत्यंत कमी कालावधी मिळाला आणि माझी यंत्रणा देखील कमी पडली. यामुळे लोकसभा निवडणुकीत मला पराभवाला सामोरे जावे लागले. पण प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. कोणत्या चेहर्‍याला मतदान करायचे, हे राज्यातील जनतेला माहिती आहे. राज्यातील सत्ता देवेंद्र फडणवीस हुकूमशाहीकडे घेऊन गेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पाहून कोणी त्यांच्या पक्षाला मतदान करणार नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

Story img Loader