नाशिक – प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलनात येथील नृत्यांगण कथक संस्थेच्या आठ नृत्यांगना सादरीकरण करणार आहेत. यंदा नारी शक्ती आणि विकसित भारत या विषयावर नृत्य सादरीकरण होणार आहे.

नवी दिल्ली येथील “कर्तव्य पथ” येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कथक नृत्यांगना नृत्य सादरीकरण करतील. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. कथक सादरीकरणासाठी भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या प्रमुख ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे मुली मेहनत घेत आहेत.

आठही विद्यार्थिनी कथक नृत्यांगना आणि गुरू कीर्ती भवाळकर यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत. भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या नृत्यांगना १२-१५ वर्षांपासून कथकचे प्रशिक्षण घेत आहेत. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या “वंदे भारतम्” स्पर्धेतील निवड प्रक्रिया पार करून समूहातील नृत्य कलाकारांची निवड झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : नाशिकमध्ये वर्षभरात एक लाखहून अधिक मतदार बाद का झाले?

यामध्ये तन्वी कुलकर्णी, जान्हवी कुलकर्णी, श्रावणी पुराणिक, साक्षी पुजारी, रिया भावसार, वसुंधरा आहेर, तेजल मांडवकर आणि अनुष्का गोखले या आठ विद्यार्थिनींचा समावेश आहे.