scorecardresearch

पुणे : “संजय राऊत म्हणत होते, ते हेच दंगे….”, किरीट सोमय्यांचं पुण्यातून टीकास्र

छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात वाद निर्माण झाला असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

kirit somaiya in pune
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या

संजय राऊत म्हणत होते की,आता दंगे सुरू होणार आहेत.संजय राऊत यांना हेच दंगे म्हणायचे होते का आहेत का ? मी पुन्हा एकदा सांगतो की, संजय राऊत हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या वतीने सांगत होते.आता पुढे दंगलीच सुरू होणार आहे.ही जी दंगल आहे. ती त्यातील आहे का असा सवाल भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा >>> “आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?” माजी सैनिकाच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना सवाल, पुण्यात लावले बॅनर

छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात वाद निर्माण झाला असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्या प्रश्नावर किरीट सोमय्या यांनी पुण्यात भूमिका मांडली. पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच काल निधन झाल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्याबद्दलच्या आठवणींना किरीट सोमय्या यांनी उजाळा दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:25 IST

संबंधित बातम्या