पुणे : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त पुणे-मऊ ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. इतर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी आणि भाविकांच्या मागणीमुळे ही विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे.

कुंभमेळ्याच्या पर्वणीनुसार विशेष रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे ते मऊ विशेष रेल्वे (०१४५५) ८, १६ आणि २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता मऊला पोहोचेल. मऊ येथून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी विशेष रेल्वे (०१४५६) पुण्याकडे येणार आहे. ही गाडी ९ जानेवारी, १७, २५ जानेवारी, तसेच ७, ९ आणि २२ फेब्रुवारी रोजी धावणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी पुणे स्थानक येथे पाेहोचणार आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री आले.. अन् वाहतूक कोंडी करून गेले

या मार्गे विशेष रेल्वे

पुणे येथून दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवडिया, छनेरा , खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड असा या विशेष रेल्वेचा मार्ग आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा – एसटीचे अपघात रोखण्यासाठी नियमावली? परिणाम पडणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० डिसेंबरपासून आरक्षण

कुंभमेळ्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेसाठी भाविकांना २० डिसेंबरपासून ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. एकूण १८ डब्यांच्या रेल्वे गाडीत वातानुकूलीत डबे, सहा सामान्य प्रवाशांसाठी ६ डबे, असे नियोजन करण्यात आले आहे.