पुणे : आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी (माळीण) येथे सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या जागेवर तयार करण्यात आलेल्या कच्चा रस्त्याच्या कामामुळे जमिनीला भेगा पडून जमिनीचा भाग पुनर्वसन वसाहत रस्त्यावर कोसळला. त्यामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या भागातील कुटुंबांची समाजमंदिरांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना तीन महिन्यांचे आगाऊ धान्यही देण्यात आले आहे. माळीण येथे पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या जागेवर पश्चिम बाजूला कच्चा स्वरूपात रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामामुळे जमिनीला भेगा पडून जमिनीचा भाग पुनर्वसन वसाहत रस्त्यावर ढासळला. या रस्त्याच्या उत्तर बाजूस तीन घेर असून त्यामध्ये चार जण वास्तव्यास आहेत. त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गॅबिय स्ट्रक्चर येथे उभाण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डबर, माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. पासरवाडी येथे एकूण ३४ कुटुंबे आहेत. हा भाग दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने विविध गट नंबरमधील ०.८० आर क्षेत्राचे भूसंपादन करून भूखंड पाडण्यात आले आहेत. त्याचे वाटप येत्या गुरुवारी (२६ जून) रोजी करण्यात येणार असून आंबेगाव पंचायत समितीकडून घरकुलांचे प्रस्तावही मंजूर झाले आहेत, असा अहवाल या घटनेसंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने राज्य शासनाला दिला आहे.