scorecardresearch

Premium

स्वातंत्र्य दिनी लोणावळय़ात उच्चांकी गर्दी; पावसाच्या विश्रांतीमुळे पर्यटकांचा हिरमोड

स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुटय़ांमुळे लोणावळा, खंडाळा परिसरात मंगळवारी पर्यटकांची उच्चांकी गर्दी झाली. भुशी धरण परिसरात झुंबड उडाली होती.

traffic in lonavala
स्वातंत्र्य दिनी लोणावळय़ात उच्चांकी गर्दी

पुणे : स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुटय़ांमुळे लोणावळा, खंडाळा परिसरात मंगळवारी पर्यटकांची उच्चांकी गर्दी झाली. भुशी धरण परिसरात झुंबड उडाली होती. उच्चांकी गर्दीचे नियोजन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वर्षांविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.

दर वर्षी स्वातंत्र्य दिनी लोणावळा, खंडाळा परिसरात मुंबई, पुण्यासह राज्यातील वेगवेगळय़ा भागांतून पर्यटकांची गर्दी होती. पर्यटक मोठय़ा संख्येने मोटारीतून दाखल होत असल्याने लोणावळा, खंडाळा, तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. गर्दी, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांसह गृहरक्षक दलाचे जवान, वाहतूक स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. उच्चांकी गर्दी होऊनही अनुचित घटना घडल्या नाहीत, तसेच कोंडीही झाली नाही. लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्यासह लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Why strengthening of Ambazari lake in Nagpur
नागपूरच्या अंबाझरी तलाव बळकटीकरणाची गरज का? यंदाही पावसाळ्यात ‘ओव्हरफ्लो’ होणार का?
solapur police commissioner marathi news, cp m rajkumar solapur marathi news
पोलीस आयुक्त एम. राजकुमारांनी डिजिटल फलकांची गर्दी हटविली, सोलापूरच्या सार्वजनिक सौंदर्याला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई
There are no Rohyo works in the rural areas of Buldhana district where drought-like conditions exist Buldhana
धक्कादायक! ५५० ग्रामपंचायतीत ‘रोहयो’ची कामेच नाही, मजुरांची दैना; दुष्काळसदृश्य बुलढाण्यातील चित्र
rahul gandhi
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नियोजित वेळेआधी संपुष्टात येणार, यूपीतील बहुतेक भाग वगळणार

सहारा पूल परिसरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुण्याहून येणाऱ्या लोकल गाडय़ांमधून मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळा स्थानक परिसरात आल्याने तेथे गर्दी झाली होती. लोणावळा रेल्वे स्थानक ते भुशी धरणापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटकांना रांगेत चालण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. त्यामुळे या भागात कोंडी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सहारा पुलासमोरील धबधबा कोरडा पडला आहे. भुशी धरण परिसरात पर्यटकांची झुंबड उडाल्याने या भागातून चालणे अवघड झाले होते. भुशी धरणातील पायऱ्यांवरून वाहणारे पाणी कमी झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. लायन्स पॉइंट परिसरात पर्यटकांची गर्दी कमी होती. मात्र, दिवसभर या भागात धुके होते. एकवीरा मंदिर ते भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, भाजे लेणी, कार्ला लेणी, पवना धरण परिसर, तसेच राजमाची गार्डन परिसरात गर्दी झाली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Large crowd in lonavala on independence day pune amy

First published on: 17-08-2023 at 00:34 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×