२०२४ च्या सुरुवातीला पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुण्यात ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत दिवसा ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा जाणवेल. सध्या पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात सामान्य स्थिती असून बहुतेक ठिकाणी निरभ्र आकाशासह किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे.

२४ डिसेंबरपासून पुण्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे अद्याप थंडीची चाहूल लागली नाही. पुण्यातील सध्याचे किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. जे गेल्या आठवड्यात ११ अंश सेल्सिअस इतकं होतं.

२८ डिसेंबरपासून उत्तर भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्ये थंडगार वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर भारत आणि महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शिवाय काही ठिकाणी धुक्याचं प्रमाणही वाढेल. २९ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत पुण्यात दिवसभरात थंडी जाणवेल, असंही आयएमडीने म्हटलं आहे.

हेही वाचा : आर्क्टिकवर आजवरचा सर्वांत उष्ण उन्हाळा ? जाणून घ्या जगावर काय परिणाम होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे शहरासह आजूबाजूच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे आणि आसपासच्या प्रदेशासाठी नवीन वर्षाची सुरुवात थंडीने होईल. गेल्या आठवड्यात पुण्यातील पाषाण येथे ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.