Maharashtra Budget Session 2024 Updates, 26 February : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू होत आहे. शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, आता ते पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहा.

Maharashtra News in Marathi
Maharashtra News : नाना पटोलेंच्या अपघातामागे संजय राऊतांचा हात? संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, म्हणाले…
tamil nadu lok sabha elections 2024 fact check dmk leader distributing gifts as part of new year celebrations falsely linked to polls
मतदानाच्या दोन आठवडे आधी द्रमुकच्या नेत्याचं पैसे वाटप? Video व्हायरल, पण नेमकं सत्य काय? वाचा…
Arvind Kejariwal Rape Accusations Of IIT Students
अरविंद केजरीवालांवर बलात्काराचा आरोप? प्रसिद्ध वृत्तपत्राचे कात्रण चर्चेत, अटकेचं खरं कारण काय?
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Live Updates

Budget Session 2024 Live Updates :  राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

18:47 (IST) 26 Feb 2024
वाघाने पतीसमोरच घेतला पत्नीच्या नरडीचा घोट, बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या…

वाघाने पतीसमोरच पत्नीवर हल्ला केला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बल्लारपूर शहरालगतच्या नाल्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. लालबच्ची चौहान (६०) असे मृत महिलेचे नाव आहे. सविस्तर वाचा…

18:46 (IST) 26 Feb 2024
अर्भकमृत्यूदर एक अंकी करण्याचा आरोग्य विभागाचा संकल्प!

राज्यातील बालमृत्यू व अर्भकमृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र शासनाच्या २०१८ च्या एसआरएस (सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम) अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जिवंत जन्मामागे १९ असा होता, त्यात घट होऊन सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार तो १६ झाला आहे. सविस्तर वाचा…

18:22 (IST) 26 Feb 2024
अभिनेता रणवीर सिंह अलिबाग मध्ये क्रिकेट खेळण्यात रमला….

अभिनेता रणवीर सिंह याने नुकतीच अलिबाग तालुक्यातील सातिर्जे गावाला भेट दिली. या भेटी दरम्यान गावात काही मुले क्रिकेट खेळत असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे तो गाडीतून खाली उतरत मुलांमध्ये सहभागी झाला. क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला. रणवीरच्या अनपेक्षित कृतीमुळे गावातील मुलेही चांगलीच अचंबित झाली.

वाचा सविस्तर...

17:39 (IST) 26 Feb 2024
मुंबई: पालिका अधिकाऱ्याला शिवसेनेच्या शाखा प्रमुखाकडून मारहाण

अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पालिका अधिकाऱ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाने मारहाण केल्याची घटना मुलुंड परिसरात घडली आहे. याबाबत अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सविस्तर वाचा

17:38 (IST) 26 Feb 2024
मुंबई : वर्सोवा येथे वाहतुक पोलिसाला मारहाण

रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतुक पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार जुहू-वर्सोव लिंक रोड येथे घडला. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अजय कोर्लेकर(५६) हे डीएन नगर वाहतुक विभागात कार्यरत आहेत. सविस्तर वाचा

17:37 (IST) 26 Feb 2024
शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारावर पंतप्रधान कधी बोलणार? शिवसेना (उबाठा) प्रवक्ते किशोर तिवारी यांचा सवाल

गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने सतत दुर्लक्ष केल्याने देशातील सर्वसामान्य जनता पिचली जात आहे. शेतकऱ्यांचे शोषण व आत्महत्या, महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कदी बोलणार, असा प्रश्न शेतकरी नेते आणि शिवसेना (उबाठा)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या अनुषंगाने उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा

17:37 (IST) 26 Feb 2024
गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्यास अटक

विविध हिंसक गुन्ह्यात सहभागी असलेल्या महिला नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (३०, रा. बडा काकलेर, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या महिला नक्षलवाद्याचे नाव असून तिच्यावर एकूण सहा लाखांचे बक्षीस होते. सविस्तर वाचा

17:36 (IST) 26 Feb 2024
नागपूर: इतवारी रेल्वे स्थानकाचे नामकरण आता या नावाने ओळखले जाणार

मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वतीने इतवारी रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इतवारी रेल्वेस्थानकाचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक’ असे नामकरण करण्यात आले. सविस्तर वाचा

17:24 (IST) 26 Feb 2024
इचलकरंजीच्या दूधगंगा पाणी योजने विरोधात सुळकुड बंधाऱ्यावर कागल तालुक्यातील महिलांचे बेमुदत उपोषण सुरू

कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या दूधगंगा पाणी योजने विरोधात कागल तालुक्यातील महिलांनी सोमवार पासून सुळकुड बंधाऱ्यावर बेमुदत उपोषण सुरू केले.इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीचे पाणी मिळावे, म्हणून इचलकरंजी वासियांकडून सतत प्रयत्न सुरूच आहेत. इचलकरंजीतील महिला सुळकुड योजनेच्या मागणीसाठी उपोषणा बसल्याने, त्याची दखल घेत मुख्यमं

त्र्यांनी शहराला शुद्ध पाणी देण्याची ग्वाही दिल्याने सुळकुड योजना यशस्वी होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.

परंतु दुसरीकडे दूधगंगा काठावरील महिला पाणी देणार नाही म्हणून आक्रमक झाल्या असून इचलकरंजी पाणी योजनेला विरोध दर्शवला आहे. त्यासाठी आज दुधगंगा नदीवरील सुळकुड बंधाऱ्या शेजारी महिला मोठा संख्येने जमल्या. त्या सर्वांनी आम्ही दूधगंगेचे पाणी देणार नाही, इचलकरंजीसह कोणालाच आमच्या हक्काच्या पाण्याचा थेंबही देणार नाही, अशा घोषणा दिल्या. या महिलांनी योजना रद्द होत नाही तोवर बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा दिला.

17:14 (IST) 26 Feb 2024
वाळूमाफियांना दणका; जळगाव जिल्ह्यात दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, उपसा आणि वाहतूक सर्रास सुरू असल्याचे भडगाव तालुक्यातील कारवाईतून पुन्हा सिद्ध झाले आहे. सहायक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पाच डंपर, पाच ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, दोन जेसीबी, असा सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करून १० जणांसह इतर जप्त वाहनमालकांविरुद्ध भडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

16:42 (IST) 26 Feb 2024
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार दोन लाख मतांनी निवडून येतील – संजय काकडे

संजय काकडे म्हणाले की, मागील ५० वर्षांपासुन बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

सविस्तर वाचा...

16:30 (IST) 26 Feb 2024
उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील जमखी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज

कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून आज अखेर डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची चर्चा होती. आज अखेर त्यांना घरी सोडण्यात आहे.

16:06 (IST) 26 Feb 2024
उरणमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई , उरण- पनवेल मार्गावरील बांधकामावर हातोडा

उरण : सिडकोच्या अतिक्रण विरोधी पथकाने सोमवारी उरण पनवेल मार्गावरील बोकडवीरा चारफाटा ते कोटनाका, उरण रेल्वे स्थानकाच्या दरम्यानच्या ६५ बांधकामावर कारवाई केली. यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन जेसीबी आणि सिडकोच्या सुरक्षा रक्षकांसह ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पत्रा,पक्के बांधकाम तसेच टपऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

अनेक ठिकाणी स्थानिकांनी सिडकोच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर, अनेकांनी स्वतःहून आपली बांधकामे रिक्त केली. यामध्ये सिडको व्यतिरिक्त बांधकाम असलेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्टे ऑर्डर आल्याने त्यांच्या अशा बांधकामावरील कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. सिडकोच्या जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करीत असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

15:59 (IST) 26 Feb 2024
नाशिक : बाजार समिती संपामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

नाशिक : महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील सुधारणांमुळे सिमांकीत बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, बाजार तळ या अनुषंगाने आडते, हमाल, मापारी शेतकरी व इतर घटकांवर परिणाम होणार असल्याकडे लक्ष वेधत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने सोमवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपात जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे कांद्यासह शेतमालाचे लिलाव पूर्णत: ठप्प झाले.

वाचा सविस्तर...

15:58 (IST) 26 Feb 2024
डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील बेकायदा इमारत भुईसपाट, ‘फ’ प्रभागाची आक्रमक कारवाई

डोंबिवली : येथील खंबाळपाडा भागातील केडीएमटी बस आगाराजवळील एस. एस. स्टील मार्टजवळील मागील अकरा वर्षाच्या कालावधीत बांधण्यात आलेली सात माळ्याची बेकायदा इमारत फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या तोडकाम पथकाने गुरूवार आणि शुक्रवारी भुईसपाट केली.

वाचा सविस्तर...

15:30 (IST) 26 Feb 2024
नागपूर: आशा स्वयंसेविकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यापुढे ठिय्या आंदोलन, मागणी पूर्ण होईस्तोवर…

नागपूरात आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परंतु शासनाकडून न्याय मिळत नाही. शेवटी आंदोलकांनी नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड या शासकीय निवासस्थानाच्या द्वारावर सोमवारी सकाळपासून ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे. सविस्तर वाचा…

15:29 (IST) 26 Feb 2024
Gold Rate in Nagpur : दोनच तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहेत आजचे दर…

नागपुरात १४ फेब्रुवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर घसरून ६१ हजार ९०० रुपयेपर्यंत खाली आले होते. परंतु आता हे दर झपाट्याने वाढत आहे. आज २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दोनच तासात सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने लग्नासह इतर कारणाने सोने खरेदीचा बेत असलेल्यांची चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा…

15:18 (IST) 26 Feb 2024
"फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्याबद्दल...", संजय राऊतांची एक्स पोस्ट

https://twitter.com/rautsanjay61/status/1762047805118402613

14:48 (IST) 26 Feb 2024
मनोज जरांगेंना 'ते' वक्तव्य भोवणार? शंभूराज देसाईंनी दिला इशारा, म्हणाले...

राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गृहविभागाला एवढंच सांगितलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळे अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचणार असेल, संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीने अवमान होत असेल तर कायदा कायद्याचं काम करेल. पोलीस पोलिसांचं काम करतील. त्यांची वक्तव्ये तपासली जातील. चौकशी केली जाईल. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणाने करू - शंभूराज देसाई

14:42 (IST) 26 Feb 2024
“लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांना देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्तेच खूप झाले”, भाजपचे माजी खासदार संजय काकडेंचे विधान

आगामी निवडणुकीत भाजपकडून ज्याला संधी दिली जाईल. तो उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल, असा विश्वास देखील काकडे यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

13:17 (IST) 26 Feb 2024
अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी ८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.

12:52 (IST) 26 Feb 2024
उरण : एनएमएमटी बस सेवा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी धरणे

उरण : नवी महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने कोणतीही पूर्व सूचना न देता उरणकरांच्या नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवन रेखा ठरलेली एनएमएमटी बस सेवा व्यवस्थापनाने बंद केली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उरण चारफाटा येथे धरणे आंदोलन केले.

वाचा सविस्तर...

12:51 (IST) 26 Feb 2024
नवी मुंबई : देशमुख टोळीचा ४ वर्ष फरार आरोपी अखेर जेरबंद

नवी मुंबई : कुख्यात संघटीत गुन्हेगार विक्रांत देशमुख यांच्या टोळीतील साथीदारास नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता. 

वाचा सविस्तर...

12:45 (IST) 26 Feb 2024
मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार नाही, कारण..., प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला. त्यांनी २७ फेब्रुवारीच्या बैठकीची माहिती दिली. परंतु, २७ तारखेला आम्ही येऊ शकत नाही. कारण, पुण्याला जाहीरसभा आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण कमिटी तिथे गुंतलेली आहे. आम्ही त्यांना विनंती केली की २८ तारखेला शक्य होत आहे का पाहा. २८ तारखेच्या बैठीकचं ते तपासतो असं म्हणाले. परंतु, आज सकाळी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत २७ ला बैठक आहे असं सांगण्यात आलंय. पुण्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे. त्यामुळे २७ च्या बैठकीला आम्ही येऊ शकत नाही. २८ ला बैठक होणार असेल तर आम्ही तेव्हा येऊ - प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1762010561510785318

12:39 (IST) 26 Feb 2024
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने शासनाचे कोट्यवधी रुपये हडपले, गंभीर गुन्हे दाखल

वर्धा : सध्या परभणी येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वर्धेच्या तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी २ कोटी ६४ लाख रुपयाचा अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.

वाचा सविस्तर...

12:22 (IST) 26 Feb 2024
नागपुरातील रामझुल्यावर भीषण अपघात, महिला कारचालकाने दोन युवकांना चिरडले

नागपूर : रामझुल्यावरून मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शहरातील मोठ्या उद्योजकांच्या कुटुंबातील दोन महिला भरधाव कार चालवित होत्या. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. मोहम्मद हुसैन (३४) नालसाहब चौक आणि मोहम्मद आतिक (३२) रा. जाफरनगर अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.

वाचा सविस्तर...

12:02 (IST) 26 Feb 2024
पहिल्या दिवशीचे विधानसभेचे कामकाज स्थगित

विधासनभेचे कामकाज स्थगित, उद्या (२७ फेब्रुवारी) सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा सुरू होणार

11:45 (IST) 26 Feb 2024
गुंगीचे औषधी देऊन विद्यार्थिनीचे अपहरण, आरपीएफच्या सतर्कतेने अपहृत विद्यार्थिनी सुखरूप

नागपूर : अपहृत विद्यार्थीनीचा आरपीएफच्या पथकाने शोध घेतला. चाईल्ड लाईनच्या मदतीने तिला छत्तीसगढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरपीएफच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरुप आहे.

वाचा सविस्तर...

11:23 (IST) 26 Feb 2024
पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. बंदमुळे मार्केट यार्डात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.

सविस्तर वाचा...

11:20 (IST) 26 Feb 2024
अनैतिक संबंधातून विनय पुणेकरचा खून; प्रेयसी साक्षी गोव्हरला अटक, प्रियकर फरार

नागपूर : छायाचित्रकार विनय पुणेकर हत्याकांडाला वेगळेच वळण लागले असून या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी साक्षी गोव्हर (३२, रा. मानकापूर) हिला अटक केली असून गोळी झाडणारा तिचा नवा प्रियकर शुक्ला अद्याप फरार आहे. त्याला शोधण्यासाठी एक पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे.

वाचा सविस्तर...

11:07 (IST) 26 Feb 2024
बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे आज लोकार्पण

बदलापूर: पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण सोमवारी होते आहे. होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे. मात्र होम प्लॅटफॉर्मवर सोमवारीही प्रवासी उन्हातच लोकल पकडण्यासाठी उभे असल्याचे चित्र होते.

वाचा सविस्तर...

11:04 (IST) 26 Feb 2024
मोठी बातमी : शिक्षक भरती प्रक्रियेत झाली उमेदवारांची शिफारस

राज्यात २१ हजार पदांसाठीची शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेत आता पुढचे पाऊल पडले असून, मुलाखतीविना नियुक्तीअंतर्गत शिक्षण विभागातर्फे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

11:03 (IST) 26 Feb 2024
पुणे : जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार

जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

11:03 (IST) 26 Feb 2024
पुणे : पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

पाषाण-सूस रस्त्यावर झालेल्या अपघातात मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा...

11:02 (IST) 26 Feb 2024
मार्डचा संप मागे

राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर मार्डने त्यांचा राज्यव्यापी संप मागे घेतला.

सविस्तर वाचा...

11:01 (IST) 26 Feb 2024
आता विकासकावर झोपु योजनेतील इमारतीची दहा वर्षे जबाबदारी, गोरेगाव आगीच्या पार्श्वभूमीवर झोपु प्राधिकरणाचा निर्णय

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतींचा ताबा दिल्यानंतर पुढील दहा वर्षांसाठी इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आता विकासकाची असणार आहे.

सविस्तर वाचा...

10:58 (IST) 26 Feb 2024
मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जालन्यात एसटी बस पेटवली; राज्यभर निदर्शने

अंबड तालुक्यातील तीर्थपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी राज्य परिवहन बस पेटवली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत.

https://twitter.com/ANI/status/1761958050225586589

10:49 (IST) 26 Feb 2024
"जरांगे पाटील ग्रामीण भागातील, त्यांची भाषा...", संजय राऊतांचं विधान

जरांगे पाटील साधे ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भाषेकडे लक्ष देऊ नका. ते काही व्हाईट कॉलर नेते नाहीत. भाजपामधील कडक इस्रीचे नेत्यांच्या भाषेकडे लक्ष द्या. एकमेकांना संपवण्याची भाषा आहे. खतम करण्याची भाषा आहे. ही भाजपाची भाषा या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील एका टोळीने बिघडवली आहे. नाहीतर हा महाराष्ट्र सलोख्याने वागणारा सुसंस्कृत वागणारा महाराष्ट्र आहे - संजय राऊत</p>

Maharashtra News Live Today 28 August 2023

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Budget Session 2024 Live Updates :  राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर