लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेलं पर्यटन स्थळ म्हणून भुशी धरणाची ओळख आहे. दरवर्षी भुशी धरण भरण्याची पर्यटक वाट पाहत असतात. आज विकेंड असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली होती.

हेही वाचा – कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटतात – शरद पवार

हेही वाचा – सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन, राज्य सरकारवर केली सडकून टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेलं भुशी धरण हे आज ओव्हरफ्लो झाले. पुणे आणि मुंबई यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक हे केवळ भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे अखेर भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. इथून पुढे काही दिवस लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.