scorecardresearch

वारजेतील खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’

व्यावसायिकांकडून खंडणी उकळणारा गुंड लक्ष्मण उर्फ भैया शेंडगे याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

macoca on extortion gang Warje
वारजेतील खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’ (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : व्यावसायिकांकडून खंडणी उकळणारा गुंड लक्ष्मण उर्फ भैया शेंडगे याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

लक्ष्मण उर्फ भैया येडबा शेंडगे (वय २३), स्वामी ऊर्फ काळू ज्ञानेश्वर खवळे (वय २२), आदित्य गणेश मंडलीक (वय २०), अनिल बापू बनसोडे (वय ३०, रा. सर्व, म्हाडा वसाहत, वारजे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी वारजेतील बिअर शॉपीमध्ये दमदाटी करून जबरदस्तीने बिअरच्या बाटल्यांची खोकी नेली होती. बिअर शाॅपी चालकाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी त्याला दमदाटी करून खंडणी मागितली हाेती.

हेही वाचा – शिष्यवृत्तीचे १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित

हेही वाचा – लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात चीनविषयक परिषद

शेंडगे आणि साथीदारांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. शेंडगे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर शेंडगे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील १९ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 21:39 IST

संबंधित बातम्या