महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील पोलीस शिपायाच्या विरोधात सोमवारी रात्री विमानतळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस शिपाई संग्राम कांबळे,असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रारअर्ज देण्यात आला होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरूड येथे पार पडली.
विश्लेषण : ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व किती?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले. होते. सातव यांच्या मोबाइल क्रमांकावर कांबळे याने संपर्क साधला. मल्ल सिकंदर शेख याच्याशी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चार गुण बहाल केल्याचा आरोप करून धमकी दिल्याचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी तक्रार अर्जात म्हटले होते.