पुणे : राज्यभरात उन्हाचा चटका वाढू लागला असून, यंदाच्या उन्हाळ्यातील आजवरच्या सर्वाधिक ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद मालेगावमध्ये झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात सध्या कोरडे हवामान आहे. हिमालयात सक्रिय असलेल्या थंड हवेच्या झंझावाताचा राज्यावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. विदर्भात काहीसे ढगाळ वातावरण आहे.

हेही वाचा >>> जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ‘मोडी लिपी’ची गोडी

मालेगाव येथे मंगळवारी राज्यातील सर्वाधिक ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल, सोलापुरात ३९.८, सांगलीत ३८.६, सातारा, कोल्हापुरात ३७.७, पुण्यात ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात चंद्रपूरमध्ये ३९.४, वाशिममध्ये ३९.२, ब्रह्मपुरीत ३८.८, नागपूर येथे ३८.५, वर्ध्यात ३९.२, परभणीत ३८.४, उदगीरमध्ये ३७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर रत्नागिरीत ३३.६ आणि अलिबागमध्ये ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> शरद पवारांचा दणका: रद्द झालेला बारामतीतील व्यापारांचा मेळावा होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किमान तापमानातही वाढ कमाल तापमानासह किमान तापनातही वाढ झाली आहे. हर्णे येथे २४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. डहाणूत २०.७, कुलाब्यात २२.५, सांताक्रुजमध्ये २०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. विदर्भात किमान तापमान सरासरी २०.० अंशांवर गेले आहे. मराठवाड्यात किमान तापमान सरासरी २२ अंशांवर असून, उदगीरमध्ये २३.२ किमान तापमानाची नोंद झाली आहे. सोलापुरात किमान २३.९ किमान तापमानाची नोंद झाली आहे.