पुणे : अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना पुण्यातील लोणी काळभोर येथे घडली आहे.या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. रविंद्र काळभोर वय ४५ असे मयत पतीचे नाव आहे.तर आरोपी पत्नी शोभा रविंद्र काळभोर वय ४२ आणि आरोपी प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर वय ४१ या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील वडाळी वस्ती परिसरात मयत रवींद्र काळभोर आणि आरोपी पत्नी शोभा काळभोर राहण्यास आहे.तर आरोपी पत्नी शोभा काळभोर आणि आरोपी प्रियकर गोरख काळभोर या दोघांमध्ये मागील पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते.या अनैतिक प्रेमसंबंध बाबत रविंद्र काळभोर यांना समजले.त्यावर रविंद्र काळभोर यांनी पत्नी शोभा यांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला.तरी देखील पत्नी काही केल्या ऐकत नव्हती,ती प्रियकराला भेटण्यास जात होती.त्यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडण झाली.

सततच्या भांडणाला आरोपी पत्नी शोभा वैतागली होती.त्यामुळे आरोपी पत्नी शोभा आणि आरोपी प्रियकर गोरख यांनी रविंद्र काळभोर यांना मारहाण करून कायमच अपंग करून टाकण्याचा प्लान केला.रविंद्र काळभोर कुठ एकटा सापडल्यावर त्याच्यावर हल्ला करायचा,ती वेळ पत्नी शोभा आणि आरोपी गोरख हे पाहत होते.त्याच दरम्यान काल रात्री रविंद्र काळभोर हे घराबाहेर झोपले आहे.ही बाब शोभा यांनी प्रियकर गोरख याला सांगितली. या दोघांमध्ये जवळपास चार ते पाच वेळा काल रात्री फोनवरून बोलणे झाले.त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास प्रियकर गोरख याने रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने वार केले.त्यामध्ये अधिक रक्तस्त्राव झाल्याने, रविंद्र काळभोर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पहाटेच्या सुमारास रवींद्र काळभोर यांच्या बाजूला राहणार्‍या आजी झाडू मारण्यासाठी बाहेर आल्या होत्या.त्यावेळी रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.या घटनेची माहीती आजींनी आजूबाजूच्या लोकांना दिल्यावर,याबाबत पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले.या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आली होती.पण त्याच दरम्यान पत्नी शोभा यांच्या हालचाली काही संशयित दिसून आल्या आणि काही वेगळी माहीती आमच्यासमोर आली. त्यानंतर आरोपी पत्नी शोभा काळभोर यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुढील काही तासात आरोपी गोरख काळभोर याला देखील ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले.