scorecardresearch

आळंदी : “मराठा समाज हा खेकड्यासारखा म्हणणाऱ्यांची तोंड…”, मनोज जरांगे स्पष्ट बोलले

एका व्यक्तीमुळे राज्यात जातीय तणाव निर्माण झालेला आहे, असे म्हणत जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

alandi, manoj jarange patil criticises chhagan bhujbal, manoj jarange patil in devachi alandi
आळंदी : "मराठा समाज हा खेकड्यासारखा म्हणणाऱ्यांची तोंड…", मनोज जरांगे स्पष्ट बोलले (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : मराठा समाज हा खेकड्यासारखा आहे. ते एकमेकांना पुढे जाऊ देत नाहीत. ते एकमेकांचे पाय खेचतात, असं मराठा समाजाबद्दल बोललं जायचं, आज त्यांची तोंड बंद करण्याचं काम मराठा समाजाने केलं आहे. मराठा समाज एकजूट झाला आहे, असे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले आहे. ते आळंदीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यामध्ये एका व्यक्तीचा विरोध वगळता इतर कोणाचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही. आमचं देखील इतरांविषयी स्वच्छ मत आहे. एका व्यक्तीमुळे राज्यात जातीय तणाव निर्माण झालेला आहे, ते करायला लागले आहेत, असे म्हणत जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.

हेही वाचा : राज्यात पुढील तीन दिवस गारठ्याचे

ashwagandha
Health Special: पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर अश्वगंधाचा उतारा
Drama OK ahe ekdam
नाटय़रंग : करोनाची लोकनाटय़ीय त्रेधातिरपीट ‘ओक्के हाय एकदम!’
madhu chopra
Video: “परिणीतीला काय गिफ्ट दिलं?” खुलासा करत प्रियांका चोप्राची आई म्हणाली, “त्यांच्या लग्नात…”
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक येत आहेत. मुंबईत होणाऱ्या सभेला देखील अशाच प्रकारे प्रचंड गर्दी होईल अशी अपेक्षा आहे. शिष्टमंडळ १८ दिवस झाले तरी बोलायला तयार नाही. यावर आज मी नेत्यांना बोलणार आहे. माझ्या इतर सहकाऱ्यांनी नेत्यांना फोन लावले, आज मी बोलतो आरक्षण देणार आहात की नाही शेवटचं सांगा? देतील अशी अपेक्षा आहे. आरक्षण तर आम्ही घेणारच आहोत. नाही दिलं तर समाजापुढं ते उघडे पडतील.

हेही वाचा : देहूत मनोज जरांगे यांची रॉयल एन्ट्री; तुकोबांचं घेतलं दर्शन, म्हणाले, “या सरकारला….”

पुढे ते म्हणाले, आरक्षणाला एका व्यक्तीचा विरोध आहे. इतरांविषयी आमचं स्वच्छ मत आहे. एका व्यक्तीमुळे राज्यात जातीय तणाव निर्माण झालेला आहे. ते जातीय तणाव निर्माण करायला लागले आहेत. मराठा समाज आता एकजूट झाला आहे. मराठा समाजाला अनेक जण नाव ठेवत होते. मराठा समाज हा खेकड्यासारखा आहे. ते एकमेकांना पुढे जाऊ देत नाहीत असं म्हणायचे, आता त्यांची तोंड बंद झाली आहेत. हे काम मराठा समाजाने केलं, असं जरांगे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil in alandi criticises chhagan bhujbal kjp 91 css

First published on: 20-11-2023 at 10:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×