पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपाेषणाला बसलेले मनाेज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किवळे-देहूराेड येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने शुक्रवारी किवळेत रस्ता राेकाे आंदाेलन केले. एक मराठा-लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही काेणाच्या बापाचे अशी जाेरदार घाेषणाबाजी करून आंदाेलकांनी परिसर दणाणून साेडला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपाेषणाचे हत्यार उपसले असून शुक्रवारी उपोषणाचा सातवा दिवस होता. जरांगे यांची तब्येत नाजूक हाेत असताना सरकार त्यांच्या उपाेषणाकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना मराठा समाजाची झाली आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिक-ठिकाणी आंदाेलन, निर्दशने, बंद पाळण्यात येत आहे.

हेही वाचा – रेल्वेचा २२ फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक! पुणे-मिरजदरम्यान गाड्या रद्द; काही गाड्या विलंबाने धावणार

हेही वाचा – “भाजपाने नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले”, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी किवळे-देहूराेड येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास किवळेत रस्ता राेकाे आंदाेलन केले. आंदाेलकांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी जाेरदार घाेषणाबाजी केली. अर्धा तास रस्ता बंद केला होता. रावेत पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना साेडून दिल्याची माहिती रावेत पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अमरनाथ वाघमाेडे यांनी दिली.