पुणे : बँकाँकहून पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पकडले. त्याच्याकडून दहा किलो रासायनिक प्रक्रिया केलेला गांजा (हायड्रोपोनिक गांजा) जप्त केला. आंतराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या गांजाची किंमत दहा कोटी पाच लाख रुपये आहे.

अभिनय अमरनाथ यादव असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी महिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अभिनय यादव हा बँकाँकहून २४ जुलै राोजी पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरला. तो गडबडीत विमानतळातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. कस्टमच्या पथकाने त्याच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्चा बॅगेत रायासनिक प्रक्रिया केलेला गांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या गांजाची किंमत आंतराष्ट्रीय बाजारात दहा कोटी पाच लाख रुपये आहे.

यादवने गांजा काेणाकडून आणला, तसेच तो पुण्यात गांजा कोणाला देणार होता, यादृष्टीने तपास सुरू असल्याचे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळावर आठवड्यापूर्वी परदेशी पक्ष्यांची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अमली पदार्थ तस्करी प्रकरणात प्रवाशांना अटक करण्यात आली होती.

खराडीत मेफेड्रोन विक्री करणारा महाविद्यालयीन तरुण गजाआड

मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चार लाख ६३ हजारांचे २३ ग्रॅम १८ मिलीग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा सहा लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०, रा. पठारे वस्ती, दुर्गामाता मंदिराजवळ, चंदननगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खराडी परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी काळूबाईनगर परिसरात एक तरुण वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी घेऊन थांबला असून, त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे मेफेड्रोन, प्लास्टिक पिशव्या सापडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुमाळ मेफेड्रोन कोणाला विकणार होता, तसेच त्याने मेफेड्रोन कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, राहुल कोळपे, संदीप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव यांनी ही कारवाई केली.