scorecardresearch

पुणे : कोंढव्यात साडेसात लाखांचे मेफेड्रोन जप्त

मुंबईहून कोंढवा भागात मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले.

पुणे : कोंढव्यात साडेसात लाखांचे मेफेड्रोन जप्त
( संग्रहित छायचित्र )

मुंबईहून कोंढवा भागात मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ५४ ग्रॅम मेफेड्रोन, तीन मोबाइल संच, रोकड असा आठ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सर्फराज इक्बाल मेमन (वय ४२, रा. राधाबाई चाळ, मुंबई),अन्सारी अमीर अहमद अब्दुल खालीक (वय ४३, रा. हुसेन बिल्डींग, मोहम्मद उमर रज्जब रोड, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोंढवा भागात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी मुंबईतील दोघे जण अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, उपनिरीक्षक एन. डी. नरुके, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या