पुणे : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्यभरातील ठाकरे गट अधिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्या घटनास्थळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पाहणी देखील केली.

त्या घटनेदरम्यान शिवसेना नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी मुंबई येथील घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर ज्या आरोपींनी रंग फेकण्याचे कृत्य केले आहे. त्या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. तेथील पोलीस अधिकार्‍यांना आरोपीला पकडण्याचे आदेश दिले असून त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरच त्या आरोपीचा नेमका काय उद्देश होता. हे समजू शकणार आहे. पण या प्रकरणी दुर्देवाने काही जण राजकारण करू पाहत आहे. तसेच काही जण राजकीय संधी म्हणून पाहत आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींला पकडून कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका मांडत विरोधकांना त्यांनी सुनावले.