शिरुर : शिरुर नगरपरिषदेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा च्या नोटिशीला केराची टोपली दाखवली असून पालिकेचा विरोधात कारवाई करत नसल्याबदल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा पुणे कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिला आहे. सय्यद यांनी सांगितले शिरुर नगरपरिषदेचा कचरा डेपो  पेटविण्यात येत असल्याचा संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळ कार्यालयाकडे तक्रार केली होती.

याबाबत प्रदूषण नियंत्रण कार्यालयाने शिरुर नगरपरिषदेस नोटीस बजावून १५ दिवसाचा आत खुलासा करण्याचा आदेश दिला होता.  परंतु आदेशाची मुदत संपल्या संपल्या पुन्हा नव्याने दि.३ मार्च  व  ०४ मार्च २०२५ रोजी कचरा डेपो पेटविण्यात आला व प्रदूषण नियंत्रण कार्यालयास दिशाभूल  करणारी कागदपत्रे सादर करण्यात आली अशी माहिती समजते असे सय्यद म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 दि.१७ मार्च  २०२५ रोजी कचरा डेपो पुन्हा  पेटविण्यात आला. कचरा  पेटल्यामुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. पर्यावरणावर व मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होतच आहे. असे सर्व असताना प्रदूषण नियंत्रण  कार्यालय नगरपरिषदेविरुध्द कोणतीच कारवाई  करत नसल्याचे सय्यद म्हणाले . प्रदूषण नियंत्रण कार्यालयाने  तात्काळ यासर्व घटनांची दखल न घेतल्यास प्रादेशिक  आधिकारी  महाराष्ट्र प्रदूषण नियंण मंडळ, पुणे  यांच्या दालनात ‘आमरण उपोषण’ करण्याचा इशारा सय्यद यांनी निवेदनाद्वारे प्रदूषण नियंत्रण कार्यालयास दिला आहे