पिंपरी: पिंपरी पालिकेच्या वतीने शहरात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना पूर्वीप्रमाणे दररोज पाणीपुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात रूपेश पटेकर, बाळा दानवले, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, अंकुश तापकीर, अनिता बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख आदी पक्षाचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> पुणे: एकतर्फी प्रेमातून खूनाचे प्रकरण; तक्रारीची दखल न घेतल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई

हेही वाचा >>> “राज्यपालांचा अपमान करणं योग्य नाही”; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांबाबत केलेले विधान…”

पालिकेने तीन वर्षापूर्वी घेतलेला पाणीकपातीचा निर्णय चुकीचा आहे. दिवसाआड आणि एकवेळ पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पाणीकपात करण्याची काहीही आवश्यकता नसतानाही काही ठराविक अधिकाऱ्यांच्या अट्टाहासामुळे शहरातील नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची टीका चिखले यांनी केली.