मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईत झालेल्या जाहीर सभेत हिंदुत्तावर आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. राज ठाकरेंनी यावेळी मशिदीवरील भोंगे न काढल्यास तिथे स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावा असे आदेश मनसैनिकांनी दिलो होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मनसेला पक्षांतरर्गंत नाराजीचा सामना करावा लागत असून पुण्यातील दोन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. पुण्यातील शहराध्यक्ष यांनीही यावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट मत मांडलं.

मनसे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात जवळपास ७० टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका मांडणारे दोन्ही नेते द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. मागील सात दिवसांपासून अनेक चर्चा सुरू असताना वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी मुंबईत भेटण्यासाठी बोलवलं असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर लोकसत्ता डॉट कॉमने वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “मला राज ठाकरेंनी बोलावलं नाही. मनसे नेते अनिल शिदोरे, नेते बाबू वागसकर आणि पुणे महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांना बोलावलं आहे. या तीन नेत्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. पण कोणत्या प्रश्नावर चर्चा होणार आहे हे मला तरी माहिती नाही”. यावेळी त्यांनी मला ठाण्याच्या सभेला येण्याचा निरोप आहे. मी त्या सभेला जाणार असल्याचं सांगितलं.

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावरच टेबल टाकून…; मनसेचा जाहीर इशारा

वसंत मोरे हे मागील 25 वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करीत आहे. शहरातील अनेक निर्णय प्रक्रियेत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सोबत घेतले. पण गेल्या तीन दिवसापासून उघडपणे वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलत आहेत. त्याच दरम्यान मनसे नेते अनिल शिदोरे, नेते बाबू वागसकर आणि पुणे महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांनाच बोलवले आहे. या बैठकीमध्ये नेमका वसंत मोरे यांच्याबद्दल काही निर्णय तरी घेतला जाणार नाही, ना असा प्रश्न निर्माण होत आहे. आता या बैठकीत काय चर्चा होते.हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यास वसंत मोरेंचा नकार

वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचं म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीय. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं होतं. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं.