पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी ३०० नागरिकांचे मोबाइल संच चोरून नेले. याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक मोबाइल संच चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून, मुख्य मिरवणूक मार्गावर चोरट्यांनी ९१ मोबाइल संच चोरले.

फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून दोन लाख ७९ हजाराचे २१ मोबाइल संच जप्त केले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. सर्वाधिक गर्दी लक्ष्मी रस्त्यावर झाली होती. बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या. उत्सवाच्या कालवधीत दहा दिवसात मध्यभागातून २५ मोबाइल चोरीच्या घटनांची नोंद पोलिसांनी केली. विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना घडल्या. मोबाइल, तसेच दागिने चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पथके तैनात केली होती, तसेच ध्वनीवर्धकावरुन पोलिसांनी मोबाइल, दागिने चोरांपासून सावध रहा, असे आवाहन केले होते.

हेही वाचा – ‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फरासखाना पोलिसांच्या पथकाने मोबाइल चोरटे फैजल अजीज खान (वय २२,रा.नाशिक) आणि कालू राजू पारख (रा.मध्यप्रदेश) यांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, गजानन सोनुने, नितीन जाधव यांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून २१ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

उत्सवाच्या काळात परराज्यातून मोबाइल चोरट्यांच्या टोळ्या शहरात येतात. चोरटे गर्दीत नागरिकांकडील मोबाइल संच चोरून पसार होता. मोबाइल चोरल्यानंतर त्वरीत सीमकार्ड फेकून दिले जाते. फरासखाना पोलिसांनी नाशिक आणि मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांना पकडले. – प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे</p>

हेही वाचा – Pune Airline: पुणेकरांसाठी खुशखबर! दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांची टोळी गजाआड

मोबाइल चोरट्यांनी महागडे मोबाइल संच लांबविल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. फरासखाना पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या टाेळीला अटक केली. तपासात महिलांनी नवी मुंबईत दागिने चोरल्याचे उघडकीस आले. गीता वेंकटेश खट्टी (वय २०), पूजा प्रविण गाझु (२४, दोघी रा. पाथर्डी, नाशिक) यांना अटक करण्यात आली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, गजानन सोनुने, रेखा राऊत यांनी ही कारवाई केली.