पुणे : गुलटेकडीतील औद्योगिक वसाहतीत दहशत माजविणारा गुंड सचिन माने याच्यासह १३ साथीदारांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी सचिन परशुराम माने (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), अजय प्रमोद डिखळे (वय २४), यश किसन माने (वय १८), अमर तानाजी जाधव (वय ३२), विजय र्पमोद डिखळे (वय १८), मोन्या उर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. ओैद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखील राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. माने याच्यासह आठ साथीदारांना अटक करण्यात आली असून उर्वरित चार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा >>> पुणे : आरोपीकडून ५० हजार रुपये घेणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माने याच्यासह साथीदारांनी गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत दहशत माजविली होती. दरोडा, जबरी चोरी, खंडणी, हप्ते गाेळा करणे, खुनाचा प्रयत्न, मुलींची छेड काढणे असे गंभीर गुन्हे माने आणि साथीदारांच्या विरुद्ध दाखल झाले आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, प्रमोद कळमकर यांनी या टोळीच्या विरुद्ध माेक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. सहायक आयुक्त सुनील पवार तपास करत आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील १६ गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.