वारजे भागात दहशत माजविणारा गुंड रवींद्र ढोले आणि साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या आदेशानुसार गेल्या दीड वर्षात शहरातील १०७ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे: गोदामात चोरीच्या उद्देशाने रखवालदाराचा खून; हडपसर भागातील खून प्रकरणाचा उलगडा, चोरटे अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र वामन ढोले (वय ३०, कर्वेनगर), प्रतीक प्रवीण दुसाने (वय २९,रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. ढोले, दुसाने यांच्या विरोधात वारजे आणि सिंहगड रस्ता परिसरात दहशत माजविणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ढोले आणि दुसाने यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागव, उपनिरीक्षक मनोज बागर, सचिन कुदळे यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी ढोले आणि साथीदाराच्या विरोधात मोक्का कारवाईचे आदेश दिले.