कोरेगाव पार्क भागात वैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करणारा गुंड अजय साळुंके उर्फ धार अजा याच्यासह साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. या प्रकरणी टोळी प्रमुख अजय काळुराम साळुंके उर्फ धार अजा (वय २३), नितीन उर्फ नट्टा मोहन म्हस्के (वय ३२), संतोष सिद्धार्थ चव्हाण (वय २७), अजय उर्फ सोन्या गिरीप्पा दोडमणी (वय २६), राेहन उर्फ नटी उर्फ ऋषीकेश मोहन निगडे (वय २८, सर्व रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- प्रमाणपत्रांअभावी एकाचवेळी दोन पदवी प्रवेशांत अडचणी; उपाययोजना करण्याचे यूजीसीचे निर्देश

कोरेगाव पार्क भागात साळुंखे आणि साथीदारांनी वैमनस्यातून एका तरुणावर हल्ला केला होता. त्याच्यावर कोयत्याने वार करुन सिमेंटचा गट्टू मारला होता. गोळीबार करुन साळुंखे आणि साथीदार पसार झाले होते. आरोपींच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा- Rapido Bike Taxi : ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साळुंके आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळे, उपनिरीक्षक संभाजी नाईक, संदीप दळवी यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी साळुंखे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाईचे आदेश दिले.