लोकसत्ता वार्ताहर

बारामती : बीड येथील घटनेमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन आठ मार्च रोजी करण्यात आले आहे. शनिवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे, याच दिवशी महिला दिनाच्या औचित्य साधून सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

बारामती कसबा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून हा निषेध मोर्चा भिगवन चौकापर्यंत काढला जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले आहे, हाच निषेध मोर्चा तहसील कार्यालयाच्या ठिकाणी गेल्यावर सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने एक निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात येणार आहे. या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजा बरोबरच इतर सर्व धर्मीय बांधवांनी सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे,

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात सध्या विविध संघटनाच्या कडून आंदोलने केली जात असून विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड येथे सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता. या मूक मोर्चा मध्ये हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच पुण्यामध्येही जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चाच्या माध्यमातून या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामतीत शनिवार दिनांक आठ मार्चला काढण्यात येणाऱ्या या निषेध मोर्चाच्या प्रसंगी बारामती बाजार पेठेतील दुकानदारांनी आप आपली दुकाने बीड घटनेच्या निषेधार्थ मोर्चाच्या कालावधीत बंद करावीत, असे आवाहन मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. या बाबतची महिती सुद्धा माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.