लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: घरातील साहित्य संपल्याचे अगोदर सांगितले नसल्याने आईने केलेल्या बेदम मारहाणीत १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.१४) दुपारी दीडच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

याबाबत वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीच्या आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या मुलीचे वय १३ वर्ष आहे.

आणखी वाचा-मुलीच्या विवाहाला तरुणाची अडकाठी, वडिलांनी केली आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायलेकी थेरगावातील शिवशंभू कॉलनी येथे राहत होत्या. घरातील साहित्य संपल्याचे अगोदर सांगितले नाही म्हणून आरोपी आईने लाकडी बांबू, लाकडी फळीच्या तुकड्याने मुलीला मारहाण केली. यामध्ये मुलीच्या हाताला, पायाला, पाठीवर व डोक्याला मार लागला. तसेच छातीवर हाताने व पायाने मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने मुलीचा मृत्यू झाला. आरोपी आईने शासकीय रुग्णालयात आणि पोलिसांना मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस तपास करत आहेत.