scorecardresearch

पुणे : अपघाताच्या बनावाने मोटारचालकाला लुटले, डेक्कन काॅलेज रस्त्यावरील घटना

याबाबत मोटारचालक अमित भोसले (वय ३१, रा. मंगलमूर्ती पार्क, कोथरुड) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : अपघाताच्या बनावाने मोटारचालकाला लुटले, डेक्कन काॅलेज रस्त्यावरील घटना
अपघाताच्या बनावाने मोटारचालकाला लुटले (प्रातिनिधिक छायाचित्र)

अपघात झाल्याचा बनाव करून चोरट्यांनी मोटारचालकाला लुटल्याची घटना येरवड्यातील डेक्कन काॅलेज रस्त्यावर घडली. याबाबत मोटारचालक अमित भोसले (वय ३१, रा. मंगलमूर्ती पार्क, कोथरुड) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुणे : कसब्यात राष्ट्रवादीचा सावध पवित्रा, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचे निश्चित

हेही वाचा – “महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार”, फडणवीसांची प्रतिक्रिया; पोटनिवडणुकीवर म्हणाले, “बिनविरोध होण्यासाठी महाविकास..”

मोटारचालक अमित येरवड्यातील डेक्कन काॅलेज रस्त्याने निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी माेटार अडविली. मोटारीने दुचाकीला धडक दिल्याची बतावणी करून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. अमित यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून दुचाकीवरून चोरटे पसार झाले. भोसले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सातपुते तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 22:44 IST

संबंधित बातम्या